Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

भरत नाट्य मंदिराचे माजी उपाध्यक्ष डॉ. वा. शं. देशपांडे यांचे निधन

वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि भरत नाट्य संशोधन मंदिराचे माजी उपाध्यक्ष डॉ. वा. शं. देशपांडे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुले, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.
डॉ. देशपांडे यांनी १९५३ साली पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली.

विधानिक तत्वांचे पालन केले तर स्वातंत्र्य अबाधित राहील; विद्यार्थी महोत्सवातून संदेश – सविस्तर बातमी

आयुष्यभर ते रुग्णसेवेशी एकनिष्ठ राहिले. वैद्यकीय सेवा देताना त्यांनी नीतिमूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. विविध वैद्यकीय महाविद्यालयांतून त्यांनी मानद व्याख्याते म्हणूनही काम केले. त्यांना संस्कृत या विषयाची अतिशय आवड होती. जुन्या संस्कृत काव्यांचा आणि नाटकांचा त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. एक छंद म्हणून वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ‘संस्कृत पारंगत’ ही परीक्षा दिली होती.
संस्कृत इतकेच महाभारतावरही त्यांचे प्रेम होते. त्यांच्या ‘गीत महाभारत’ या काव्यामालेला वसंत आजगावकर यांनी संगीत देऊन, त्याच्या गायनाचे भारतभर कार्यक्रम केले. तसेच दिलीप प्रभावळकर यांनी त्याचे काव्यवाचनही केले आहे. गीता धर्म मंडळ आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघांत त्यांनी महाभारतावर भाषणे दिली आहेत.

बाणाच्या कादंबरीवर आधारित त्यांनी लिहिलेल्या सं. भेटता प्रिया या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत विविध बक्षीसे ही मिळाली होती. नुकतेच राज्य नाट्य परिषदेने या नाटकाच्या नाट्यवाचनाचा प्रयोग ही केला होता. चारुदत्त, वसंतसेनेच्या कथेवर आधारित सं. स्वप्न गणिकेचे, मार्ग त्यांचे वेगळे अशी इतर ७–८ नाटके त्यांनी लिहिली आहेत.

भरत नाट्य संशोधन मंदिराचे ते उपाध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी अनेक होतकरू कलाकारांना संधी दिली. सर्वसामान्य लोकांपर्यंत नाटक पोचावे म्हणून भरत नाट्य मंदिराने स्वस्त नाटक योजना आणली होती. ती त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवली.

बुधवारी श्रद्धांजली सभा

डॉ. वा. शं. देशपांडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×