पुण्यात ढगाळ वातावरण, तापमानात घट, नागरिकांना दिलासा

पुण्यात पावसाची हजेरी; तापमानात घट, नागरिकांनी घेतला दिलासा

Marathinews24.com

पुणे – शहरात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.  त्यामुळे शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे  उष्णतेपासून पुणेकरांना  दिलासा मिळाला होता.  दरम्यान, मागील काही दिवसांपासून नागरिकांना प्रचंड उनाच्या कडाक्याला सामोरे जावे लागत होते. मात्र, पावसामुळे  तापमानात ३ ते ४ अंशांनी घट झाली असून, हवामान आणखी काही दिवस असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शुक्रवारी दिवसभरात वादळ, वारे, पाउस पडला नाही.

पुण्यात शुक्रवारी दिवसभर हवामान ढगाळ असल्यामुळे दुपारच्या तपामानात घट झाली होती. दुपारी तपमान ३३ अंश सेल्शियश होते. तर उत्तरपूर्व पासून वार्‍याची मंद  वारा १४ ते १८ प्रति तास किलोमीटर वेगाने वाहत होता. संध्याकाळच्या तपमानात घट होउन २८ अंश सेल्शीयवर असल्याची  माहिती हवामान खात्याने दिली आहे. आकाशात  लहान-मोठे ढग असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.  दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये  पश्चिमी वार्‍यांमुळे पुण्यात गुरूवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  कोथरूड, सिंहगड रोड, हडपसर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट भागांत पावसाची नोंद झाली.

तापमान सरासरीपेक्षा अधिक

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा थोडे कमी असू शकते. पुणे शहरात कमाल तापमान सुमारे ३६ असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची नोंद झाली नाही.

मनोरंजन

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top