केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता…

केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता...

वनाज सोसायटीमध्ये आगीच्या नुकसानीची केली पाहणी

marathinews24.com

पुणे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यतत्परतेची अनुभूती कोथरूड परिसरातील वनाझ सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी घेतली. दोन दिवसांपूर्वी मीटर रूमला आग लागून इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत झळ पोहोचली होती. या दुर्दैवी घटनेत नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याठिकाणी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धाव घेत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन मीटर बसवून देण्याच्या सूचना दिल्या. नवीन ट्रान्सफार्मर मोकळ्या जागेच बसविण्यासंदर्भाच सूचित केले. तसेच पुन्हा असा प्रकार घडू नये तसेच तातडीने उपाययोजना कराव्यात, याबाबतची सूचना केल्या.

बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटक – सविस्तर बातमी 

केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता...

आगीत संपूर्ण मीटर जळाल्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हानी टळली असून, सर्व परिसराची पाहणी करत नागरिकांनी आधार देण्याचा प्रयत्न केला. या परिसरात डी-बिल्डिंगमधील संपूर्ण मीटर जळून खाक झाले होते. त्याचबरोबर मीटर रूमपासून नागरिकांच्या घरापर्यंत गेलेल्या सर्व वाहिन्या देखील जळून खाक झाल्या होत्या. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावरील सदनिका धारकांना याची सर्वात जास्त झळ पोचली. यावेळी महावितरण आणि अग्निशामक दलाचे अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी वनाझ परिवाराचे अध्यक्ष विनायक पवार, संजय काळे, भाऊसाहेब सातपुते, विकास जाधव, यतीन घरत, विशाल उभे यांच्यासह परिवारातील असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×