Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटक

बसप्रवासात उलटीचा केला बहाणा, चोरट्या महिलेला अटक

चंदननगर पोलिसांची कामगिरी, साडेसात लाखांचा ऐवज महिलेला केला परत

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज चोरणाऱ्या दोन महिलांना पकडण्यात चंदननगर पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून जप्त केलेल्या ७ लाख ५८ हजार ५२९ रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी तक्रारदार महिलेला सोमवारी (दि. ९) परत केले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते तक्रारदार महिलेला ऐवज सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही महिला आरोपी या सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.

तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत – चतु:शृंगी पोलिसांची कामगिरी

कुसुम सुरेश जाधव आणि शांता राजू जाधव (वय ६०, दोघी रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २५ मे रोजी चिखली ते चंदननगर असा पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत दोघींनी त्यांच्या गळ्यातील साडेसात लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले होते. यापक्ररणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अजय असवले यांच्यासह पथकाला बसमध्ये चोरी करणाऱ्या संशयित महिला चंदननगर बायपास येथील पीएमपी बस स्टॉपवर उभ्या असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत, विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर दोघींना अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, उपनिरीक्षक असवले, पोलिस अंमलदार शेखर शिंदे, मनिषा जगताप, प्रियंका पवार, पुनम हंबीर आणि सावंत यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×