तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत

तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत

तक्रारदारांच्या चेहर्‍यावर उमटले हसू – चतु:शृंगी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे  – चोरीच्या गुन्ह्यातील तीन प्रकरणात जप्त करण्यात आलेले तब्बल ३६ तोळ्यांचे दागिने मूळ तक्रारदारांना परत करण्यात चतुःशृंगी आणि चंदननगर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या चेहर्‍यावर हसू उमटले असून, पोलिसांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते संबंधित ऐवज तक्रारदारांना देण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे उपस्थित होत्या.

तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून जप्त केलेला ऐवज न्यायालयाच्या परवानगीने मूळ तक्रारदारांना देण्यात आला. २२ लाख रुपये किमतीचे ३६ तोळ्यांचे दागिने तक्रारदारांना परत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाद्वारे चारही आरोपींना अटक केली.

तब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परत

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननवरे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस अंमलदार श्रीकांत वाघवले, श्रीधर शिर्वेâ, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबा दांडगे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top