Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त वाहतूक बदल

रामनवमी निमित्त पुण्यात वाहतूक बदल

पुढील आदेशापर्यंत वाहतूक बदल लागू राहणार

marathinews24.com

पुणे – कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामानिमित्त (सेगमेंट लाॅचिंग) या परिसरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ‘अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. शुक्रवारपासून (१९ जून) तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. वाहतूक नियोजनासाठी कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज चौकातील राजस सोसायटीत पुलाचा वापर न करता शेजारील सेवा रस्त्याचा वापर करावा.

भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणी – सविस्तर बातमी

राजस सोसायटी येथील पुलावरील वाहतूक कात्रज ते कोंढवा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. कात्रज तलावाकडून येणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौक, तसेच कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून सेवा रस्त्याने जावे.

राजस सोसायटीकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांनी कपिल डेअरीकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. उड्डाणपुलाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे’, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×