Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडा

Pune Crime News

वारजे माळवाडीत घटना, ४५ हजारांची केली लुटमार

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात कोयताधारी टोळक्याची दहशत कायम असून, शस्त्रांचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अशीच एक घटना ७ जूनला रात्री साडेसातच्या सुमारास वारजे माळवाडीतील तपोधाम परिसरातील लेन क्रमांक पाचमध्ये घडली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सराईतांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघानांही टोळक्याने मारहाण करीत ४५ हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी टोळक्याने शस्त्रे हवेत फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत राडा घातला.

छळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या – सविस्तर बातमी 

आशितोष नारायण साठे (वय २२, रा. कुळे, मुळशी ) ओम सचिन वनकुद्रे (वय १९ रा. तपोधाम सोसायटी, वारजे) सुमित दीपक तावडे (वय २० रा. दांगट पाटीलनगर वारजे) वेदांत राजेंद्र भास्कर (वय २४, रा. नर्‍हे) पॉलजेरॉल्ड फर्नांडीस (वय २९ रा. वारजे ) यांना अटक केली आहे. रफिक मोहम्मंद मणियार (वय ५४ रा.स वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक हे भंगार साहित्य व्यावसायिक असून, ७ जूनला रात्री सव्वा सातच्या सुमारास त्यांचा कामगार गोविंदकुमार हा टेम्पो घेउन घरी जात होता. त्यावेळी सराईत टोळक्याने त्याला अडवून दारूसाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी गोविंदकुमारने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे टोळक्याने त्यांच्या टेम्पोची काच फोडली. त्यांना बेदम मारहाण करीत खिशातील २०० रूपये काढून घेतले. त्यामुळे गोविंदकुमारने फोन करून घटनेची माहिती शाहिदला दिल्यामुळे तिघेजण त्याठिकाणी गेले. शाहिद अमन, राहिल मणियार घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी टोळक्याला टेम्पोची काच का फोडली अशी विचारणा केली. त्यामुळे टोळक्याला त्यांचा राग आला.टोळक्यातील एकाने शाहिदच्या डोक्यात काचेची बाटली मारून गंभीररित्या जखमी केले. तसेच राहिलच्या हातावर मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटून नेला.

आरोपींनी शाहिदच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. मी आशितोष साठे या भागातील भाई आहे, असे म्हणत धमकी दिली. तुला आमच्या भागात धंदा करायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल असे म्हणत सराईत साठेने हवेत शस्त्रे फिरवून दहशत निर्माण केली. आम्ही इथले भाई असून, आमच्या मध्ये कोणी आले तर एकएकेला खल्लास करू अशी धमकी दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित आरोपींना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×