Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजन

लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजन

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे –  जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत, फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती, आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची याबाबत प्रोत्साहनकरिता १३ जून २०२५ रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

प्रशिक्षण कार्यक्रम भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अॅड कॉमर्स कॉलेज, शिवाजीनगर पुणे येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त लघुउद्योजक यांनी सहभागी व्हावे व आपल्या सहभागाबाबतची नोंदणी https://forms.gie/1mTU5sJnruXWxPhz8 या लिंकवर करुन लघुउद्योजक यांनी प्रशिक्षणाचा लाभघ्यावा असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दुरध्वनी क्रमांकावार संपर्क करावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×