Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सार्वजनिक उपक्रम समितीची मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

सार्वजनिक उपक्रम समितीची मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

‘खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा घेतला आढावा 

marathinews24.com

पुणे – सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा आढावा घेतला. या भेटीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ – सविस्तर बातमी 

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटमार्ग टाळता येणार असून, वाहतुकीतील अडथळा कमी होणार आहे. ९ किमी लांबीचा आणि २३ मीटर रुंदीचा बोगदा देशातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. तसेच, या प्रकल्पांतर्गत १८५ मीटर उंच पूल बांधण्यात येणार असून, देशातील सर्वात उंच पूल बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रात नोंदवला जाणार आहे. हे प्रकल्प आणि पूल पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ व आरामदायी होईल.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीला माहिती दिली, की या प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील अभियंते व कामगार हे काम समर्थपणे पूर्ण करत आहेत, समितीने त्यांच्या कार्याचे कौतुक केले. समितीच्या सदस्यांमध्ये समिती प्रमुख आमदार राहुल दादा कुल यांच्यासह आमदार सुभाष देशमुख, आमदार नीलेश राणे, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत ओगले, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदा वरुण सरदेसाई, आमदार रईस शेख यांचा समावेश होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×