कामगारांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – ज्येष्ठ महिलेच्या घरातून ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना कोथरूडमधील डहाणुकर काॅलनी परिसरात घडली. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या दोन कामगारांविरुद्ध अलंकार पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी
तक्रारदार महिलेची आई डहाणूकर काॅलनी भागात राहायला आहे. आई वृद्ध असल्याने काळजी घेण्यासाठी दोन कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. कामगारांनी ज्येष्ठ महिलेच्या घरातील कपाटातून ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. दागिने लांबविल्यानंतर कामगार पसार झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहे























