Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

नागरिकांनो….गणेशोत्सवानिमित्त रिल्स बनवा, पुणे पोलिसांचे आवाहन

संस्कृती आणि सुरक्षेचा सकारात्मक संदेश द्या

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांसाठी खास रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतून नागरिकांना संस्कृती आणि सुरक्षेचा सकारात्मक संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी तीन विषय जाहीर केले आहे. यामध्ये गणेशोत्सवादरम्यान २४ तास सज्ज असलेले पुणे पोलिस कर्मचारी, उत्सव साजरा करताना नागरिकांनी घ्यायची खबरदारी, तसेच गणेशोत्सवाचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू या विषयांवर रील तयार करता येणार आहे.

पुणे पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी

नागरिकांनी बनवलेली आपली रील ३ सप्टेंबरपर्यंत पुणे पोलिसांकडे पाठवायची आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट रील्सना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, निवडक रील्स पुणे पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. रील तयार करताना कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा दृश्य न वापरण्याचे तसेच नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे मजकूर टाळण्याची विशेष दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. तसेच स्पर्धकांनी आपली रील इंस्टाग्रामवर पोस्ट करून अ‍ॅट पुणे पोलिस सिटी हँडलला टॅग करून डायरेक्ट मेसेजद्वारे पोलिसांकडे पाठवावी, असे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×