Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

सिंहगड रस्ता भागातील दवाखान्यातून संगणक चोरी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सिंहगड रस्ता भागातील दवाखान्यातून संगणक चाेरीला गेल्याची घटना उघडकीस आली, तसेच बाणेर भागातील एका ओैषध विक्री दुकानातून चोरट्यांनी ९० हजारांची रोकड आणि सुवर्ण नाणे लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

सराईत दुचाकी चोरट्याला अटक, ४ दुचाकी जप्त – सविस्तर बातमी

याबाबत एका डाॅक्टरांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांंनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार डाॅक्टारांचा नऱ्हे भागात दवाखाना आहे. चोरट्यांन दरवजा उचकटून दवाखान्यातील संगणक चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार बांदल तपास करत आहेत. बाणेर भागातील एका ओैषध विक्री दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील ९० हजारांची रोकड आणि सोन्याचे नाणे चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे बाणेर परिसरातील ज्युपिटर हाॅस्पिटलसमोर ओैषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यानी २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड आणि सोन्याचे नाणे असा ऐवज चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.

मोटारीचा जॅमर चोरून चालक पसार

पुणे- बेशिस्तपणे लावलेल्या मोटारीच्या चाकाला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावल्याची कारवाई केल्यानंतर मोटार चालकाने जॅमर तोडल्याची घटना विमाननगर भागात घडली. वाहतूक पोलिसांचा जॅमर चोरून पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार कुशाबा गवारी यांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माेटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात सम-विषम दिनांक न पाहता मोटार चालकाने मोटार लावली होती. विमाननगर पाेलीस चौकीसमोर बेशिस्तपणे माेटार लावल्याने वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (२८ ऑगस्ट) कारवाई करून जॅमर लावला. मोटार चालकाने सायंकाळी पाचच्या सुमारास मोटारीचा जॅमर तोडला. जॅमर चोरुन मोटार चालक पसार झाला. जॅमर तोडून मोटार चालक पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत. यापूर्वी शहरात मोटारचालकांनी जॅमर चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×