Breking News
Shivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न

राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व चॉईस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

marathinews24.com

पुणे – भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्टला क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व चॉईस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. गोळीबार मैदान ते सेव्हन लव्हज चौक मार्गे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ दरम्यान क्रीडा रॅली आयोजित करण्यात आली.

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

क्रीडा रॅलीस जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर अस्सी, यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी लकडे यांनी विचार व्यक्त केले. जनजागृती प्रभात फेरीत पूना कॉलेज व परिसरातील २० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास १ हजार खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी सहभाग घेतला. जनजागृती प्रभात फेरीत मोलेदिना हायस्कूल, माउंट कार्मेल हायस्कूल, क्रिसेंट हायस्कूल, एस. एम. जोशी हिंदी हायस्कूल, अंजुमन ए इस्लाम हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, लेडी हवाबाई हायस्कूलसह अनेक शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी बैंड पथक, झांज पथक, लेझीम पथक तसेच क्रीडाविषयक प्रात्यक्षिके सादर केली. सरदार दस्तुर मुलांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोड स्केटींगची प्रात्यक्षिकेही सादर केली.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शैक्षणिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिक्षक, क्रीडाक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल प्राचार्य आफताब अन्वर, लकडे, आसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व सुरक्षा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×