Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

१७ सप्टेंबर रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेच्या तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम क्रमांक ६२ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७ सप्टेंबर रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी महाविद्यालयाने अर्ज करावे-निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम – सविस्तर बातमी 

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एसएसबी -६२ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुदित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलीली असावी उमेदवार कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकादमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उर्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीकरिता शिफारस केलेली असावी. टेक्नीकल सॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल पत्ता व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×