Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

‘एनसीएल’च्या आवारात चंदनाची झाडे चोरणारे अटकेत

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

चोरट्यांविरुद्ध चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारात शिरलेल्या आणि चंदनाची सात झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी पकडले. चोरट्यांबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले आहेत याप्रकरणी बाबू ताया लोखंडे (वय ४९, रा. केडगाव, ता. दौंड), सुरेश पाटोळे (वय २८, रा. खुटबाव, चाळोबा वस्ती, ता.दौंड) यांना अटक करण्यात आली. दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पराग रमेश चिटनवीस (वय ५६, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाेखंडे, पाटोळे आणि साथीदार हे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मध्यरात्री राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाच्या सात झाडांचा बुंधा कापून नेला. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांनी चंदन चोरटे लोखंडे, पाटोळे आणि साथीदारांना पाहिले. सुरक्षारक्षकांनी लोखंडे आणि पाटोळे यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार अंधारात भिंतीवरून उडी मारून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

शहरातील शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, बंगले, सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी एनसीएल, राजभवन, पुणे विद्यापीठाच्या आवारातूनही चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. चंदनाच्या झाडांचे बुंधे यांत्रिक करवतीचा वापर करून कापले जातात. मध्यरात्री पाहणी करून चोरटे चंदनाची झाडे कापून नेतात. चंदनाचा वापर सुवासिक तेल, अत्तरे तयार करण्यासाठी केला जातो. काळ्या बाजारात चंदनाच्या झाडांना मोठी किंमत मोजली जाते. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड तालुक्यातील चोरट्यांच्या टोळ्या चंदनाची झाडे कापून नेण्यात तरबेज आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×