Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

नीरवांगीत रेशीम कार्यशाळा संपन्न

रेशीम किटक व तुतीवरील रोग आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – रेशीम दिन आणि मेरा रेशम मेरा अभिमान निमित्ताने जिल्हा रेशीम कार्यालय पुणे व केंद्रीय रेशीम मंडळ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालय नीरवांगी येथे एकदिवसीय रेशीम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी रेशीम किटक व तुतीवरील रोग आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

श्री गणेश सर्वांना सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो-मुख्यमंत्र्यांची प्रार्थना – सविस्तर बातमी

जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी कोश विक्री, कोश मार्केट, रेशीम योजना व कोशोत्तर प्रक्रिया, प्रशिक्षण याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी आजपासून जिल्ह्यात शासनाची “रेशीम विभाग आपल्या दारी मोहीम २०२५” सुरु झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत तुती लागवडीकरिता नोंदणी शुल्क भरूनही लागवड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना चालू वर्षी शुल्क न भरता तुती लागवडीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अजिंक्य चॉकी सेंटर निरवांगी यांचेकडून आसिफ तांबोळी पळसदेव, गणेश उत्तम कोरटकर सुरवड, ओंकार मारकड रुई या शेतकऱ्यांचा ट्रॉफी तापमान आद्रता मापक उपकरण देऊन सत्कार करण्यात आला. म्हसोबावाडी येथील रेशीम उत्पादक शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पोळ पाटील, निराभिमा साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पोळ, ग्रामपंचतीचे पदाधिकारी, कार्यशाळेस इंदापूर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×