Breking News
शेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेशमाजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहनलघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजनछळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्यापुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाशरुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफास

पादचारी तरुणाचा १ लाखांचा मोबाइल हिसकावला..

रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोर पसार- सदाशिव पेठेतील घटना

Marathinews24.com

पुणे – भरदिवसा पादचारी तरुणाचा १ लाख रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मध्यवर्ती सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी तरुण बुधवारी (२ एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास सदाशिव पेठेतील उद्यानप्रसाद मंगल कार्यालयाजवळून दुपारी अडीचच्या सुमारास जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील १ लाख रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांंचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत. दरम्यान, नाना पेठेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top