Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

भर चौकात वादातून पिस्तूल रोखणारा सराइत गजाआड

पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्त

सराइताकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त

marathinews24.com

पुणे -भर चौकात वादातून एकावर पिस्तूल रोखणाऱ्या सराइताला विश्रांतवाडी पोलिसांनी गजाआड केली. त्याच्याकडून इटालियन बनावटीचे पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले. विश्रांतवाडी पोलीस, तसेच गस्त घालणाऱ्या ‘काॅप्स २४ ’ योजनेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी वादावादी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन सराइताला पकडल्याने अनर्थ टळला.

टँकरचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिला ठार – सविस्तर बातमी 

तौफिक उर्फ रकीब रफीक शेख (वय ३२, रा. श्रमिक वसाहत, सावंत पेट्रोल पंपासमोर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात ४ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू असून, एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढून रोखल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांचे पथक आणि ‘काॅप्स २४’ योजनेअंतर्गत गस्त घालणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेण्यात आले. शेख याच्याकडील पिस्तूल इटालियन बनावटीचे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पिस्तुलासह एक काडतूस जप्त केले. जप्त केलेले पिस्तूल ५० हजार रुपयांचे आहे.

शेख याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन शेखला पकडल्याने अनर्थ टळला. शेख याच्याकडे शस्त्र परवाना नाही. त्याने परदेशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले ? यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने पिस्तूल चोरल्याचा संशय आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, तसेच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी लंघे आणि माळी यांनी ही कामगिरी केली. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांनी तपास पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतूक केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×