Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

मोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपास

मोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपास

पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून पाच लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरात घडली..याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भर चौकात वादातून पिस्तूल रोखणारा सराइत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. ते कुंजीरवाडी परिसरात राहायला आहेत. व्यावसायिक कामानिमित्त त्यांना जर्मनीला जायचे होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (६ जून )दुपारी सोलापूर रस्त्यावरील एका बँकेतून पाच लाखांची रोकड काढली. रोकड मोटारीत ठेऊन ते कुंजीरवाडी परिसरातील एका हाॅटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आले. त्यांनी मोटार हाॅटेलसमोर असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीच्या कप्यात ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक काळभोर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×