Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा

उपमुख्यमंत्री अजित पवार करणार उदघाटन

marathinews24.com

पुणे – पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ४ सप्टेंबरला गणेश कला क्रिडा, पुणे येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत.

मराठा आंदोलनकर्त्यांच्या सोयी-सुविधांसाठी माजी अधिकारी मैदानात – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेवून चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम असून त्याचे प्रमुख घटक सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण, ग्राम पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोक सहभागातून लोकचळवळ निर्माण करणे असे आहेत.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचायत राज संस्थांच्या सामर्थ वर्धनासाठी, विविध योजनांचा समन्वय व अंमलबजावणीसाठी तसेच स्थानिक लोकांच्या सक्रिय सहभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला नवे बळ मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×