Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुण्यात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी खडकी आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. खडकी परिसरातील तरुणीची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चार लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला हाेता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी तरणीला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर तरुणीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने तरुणीचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी तिला ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तरुणीने २६ ते ३१ जुलै या कालवधीत चोरट्यांच्या खात्यात चार लाख १६ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. तिने चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तीन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×