गुंतवणुकीचे आमिष, व्यावसायिकाची १ कोटी १२ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजीव अशोक केंद्रे (रा. एलेजियम सोसायटी, पिंक सिटी रस्ता, वाकड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

तक्रारदार व्यावसायिक पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहायला आहेत. आरोपी केंद्रे आणि त्यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपींचे बाणेर भागात खासगी कार्यालय होते. आरोपीने त्यांना शेअर बाजार, तसेच परकीय मुद्रा व्यवहारात (फाॅरेक्स ट्रेडिंग) गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाकडून आरोपी केंद्रे याने वेळोवेळी १ कोटी १२ लाख रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×