पर्वती पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार्याला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा ३५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहेत. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८ रा. शनि मंदिरामागे, चाळ नं. १३, दत्तवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुध्द पर्वती पोलीस ठाण्यातंर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५),महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुंतवणुकीचे आमिष, व्यावसायिकाची १ कोटी १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलीस ४ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोिंगक करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्या आरोपीची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून स्वप्निल कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे जप्त केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, मनोज बनसोड, सुर्या जाधव, नानासो खाडे, राकेश सुर्वे, धनंजय रौदळ यांनी केली.























