Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डिजे विरहीत मिरवणुकीचे सर्वत्र स्वागत

marathinews24.com

पुणेसालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने  साजरी करण्यात आली . यंदाची वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आयटीआर व टॅक्स ऑडिटसाठी मुदत वाढीची मागणी – सविस्तर बातमी 

सिरत कमिटीच्या वतिने आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून झाली. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार , पोलिस उपायुक्त विवेक मासाळ , मौलाना ज़मीरुद्दिन, मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना खालिद निजामी, मौलाना गुलाम अहमद खान , रफीउद्दिन शेख ,माजी आमदार मोहन  जोशी, रिपब्लिकन सोशालिस्ट पाक्षाचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत जगताप , माजी नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, सिराज बागवान, जावेद खान, आबिद सय्यद , जावेद शेख , हाजी नजीर तांबोळी , आसिफ शेख , सूफियान कुरैशी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुण्यातील सिरत कमिटी पदाधिकारी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पदमजी पोलिस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशिद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद विंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गांनी मिरवणूक निघून शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे समाप्त झाली.

यावेळी जवळपास सर्च प्रमुख चौकांत विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतिने मिरवणुकीचे सावागत करण्यात आले. डि जे विरहीत हि मिरवणुक निघाल्याने नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. दरम्यानपैगंबर जयंतीचे १५०० वे वर्ष लक्षात घेवुन सिरत कमिटीच्या वतिने शहरातील विविध भागात वरिषभर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जाणार असल्याचे सिरत कमिटीचे सिराज बागवान व जावेद शेख यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×