Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काळजी घेऊ- पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काळजी घेऊ- पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मिरवणुकीवेळी दोन ढोल ताशा पथक यांच्याकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी दोन ढोल ताशा पथक यांच्याकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सोमवारी (दि .८) भेट घेतली. यावेळी पत्रकारांसोबत वार्तांकनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांना वार्तांकन योग्य प्रकारे करता येईल, पत्रकारांची सुरक्षा देखील राहील याची पुरेशी काळजी आगामी काळात घेऊ असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते.

ॲड.भास्करराव आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज-भारत सासणे – सविस्तर बातमी 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, विसर्जन मिरवणुकीवेळी ढोल ताशा पथकांचे नियमन करण्यासाठी आगामी काळात विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाईल. पथकातील सदस्य संख्या मर्यादित राहावी यासाठी ढोल ताशा पथक संघटना आणि गणेश मंडळे यांना देखील सूचना दिल्या जातील. महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई तात्काळ करू असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले. पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जे पोलीस पासेस दिलेले असतात त्यानुसार, नियमित वार्तांकन करण्याची मुभा देखील असते याची कल्पना संबंधितांना दिली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात योग्य प्रकारे वार्तांकन पत्रकारांना करता यावे यादृष्टीने कार्यक्रमांपूर्वीच योग्य प्रकारे चर्चा विनिमय करून आवश्यक उपाय योजना राबवल्या जातील असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×