Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

पतीसमोरच महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकावले

पुण्यात धुमस्टाईल दागिने हिसकावण्याचा सपाटा कायम

पतीच्या डोळ्यादेखत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची लूट

marathinews24.com

पुणे – पतीसोबत असतानाही दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेजवळ येउन तब्बल ७० हजार रूपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास वंडरसिटी मुख्य गेटसमोरील रस्त्यावर घडली आहे. चोरट्यांना कशाचीही भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. मागील काही काही दिवसांपासून सातत्याने दुचाकीस्वार चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावून नेले जात आहेत. मात्र, तरीही स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाईचा बडगा का उगारला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

भरधाव मोटार चालकाने दुचाकीस्वार महिलेला उडविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार राजश्री मिलींद कुलकर्णी (वय ४४, रा. कात्रज) कुटूंबियासह कात्रजमध्ये राहायला आहेत.१८ मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर राजश्री पतीसोबत शतपावली करण्यासाठी जात होत्या. घरातून काही अंतर चालून गेल्यांनतर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर राजश्रीजवळ येउन चोरट्यांनी ७० हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. पती मिलींदसोबत असतानाही चोरट्यांनी धाडस केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कुलकर्णी दाम्पत्याने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×