Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

दारू पिण्याच्या वादातून लहान भावाचा केला खून, बिबवेवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – सख्खा भाऊ बनला पक्का वैरी – सतत दारू पिउन त्रास देत असल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून खून केल्याची घटना सोमवारी दि. १४ सकाळच्या सुमारास बिबवेवाडीतील गणेशनगरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २४ रा. गणेशनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत दत्तात्रय नवले (वय २६ रा. अप्पर बिबवेवाडी) याला अटक केली आहे.

तरुणीची सोनसाखळी हिसकावली,ओैंध परिसरातील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाउ असून, बिबवेवाडीत राहायला आहेत. मागील काही दिवसांपासून प्रवीण सतत दारू पिउन कुटूंबियांना त्रास देत होता. काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे अनिकेत वैतागला होता. त्याच रागातून सोमवारी दि. १४ त्यांच्यात वादविवाद झाला. त्यानंतर राग सहन न झाल्यामुळे अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार करीत गंभीररित्या जखमी केले. नागरिकांनी प्रवीणला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आरोपी अनिकेत नवले याला ताब्यात घेत अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×