Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

तरुणीची सोनसाखळी हिसकावली,ओैंध परिसरातील घटना

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या तरुणीच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना ओैंध परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याला भीमाशंकरच्या जंगलात चाकूच्या धाकाने लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही रविवारी (१३ जुलै) दुपारी मित्राबरोबर उपाहारगृहात जेवण करण्यासाठी जाणार होती. ओैंधमधील नागरस रस्त्यावरील एका सोसायटीत ती राहायला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ती सोसायटीच्या प्रवेशद्वारसमोर थांबली होती. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. तरुणीने आरडाओरडा केला. चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ओैंध भागातील नागरस रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत. बालेवाडी भागात दोन दिवसांपूर्वी एका सोसायटीसमोरुन निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याची घटना घडली होती.

मद्यविक्री दुकानातून रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविल्या

मद्यविक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, रोकड असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली. याबाबत हरप्रीतसिंग भुपेंद्रसिंग होरा (वय ४०, रा. एनआयबीएम रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होरा यांचे महंदमवाडी परिसरात नॅशनल वाईन शाॅप हे मद्यविक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मद्यविक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार काळभोर तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी कल्याणीनगर भागातील एका मद्यविक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या आणि रोकड लांबविल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×