Breking News
Mobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्या

Crime News : व्यापाऱ्याला भीमाशंकरच्या जंगलात चाकूच्या धाकाने लुटले

Pune Woman Police Assault

रिक्षाचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Crime News : व्यापाऱ्याला भीमाशंकरच्या जंगलात चाकूच्या धाकाने लुटले आसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या रिक्षाचालकााचा शोध घेण्यात येत आहे.

पीएमपीच्या धडकेत प्रवासी महिला जखमी; पीेएमपी चालकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

याबाबत एका ६१ वर्षीय व्यापाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी दक्षिण दिल्लीतील बदरपूर भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शनिवारी (१२ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास ते पुणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेने उतरले. त्यांना बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जायचे होते .पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल कार्यालयासमोर एक रिक्षाचालक थांबला होता. व्यापाऱ्याने भीमाशंकरला दर्शनासाठी जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे सांगितले. प्रवास लांबचा असल्याने रिक्षाचालकाने अगोदरच भाडे निश्चित केले. भीमाशंकर दर्शनासाठी जादा रिक्षा भाडे द्यावे लागेल, असे रिक्षाचालकाने त्यांना सांगितले.

त्यानंतर रिक्षाचालक सकाळी सव्वानऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून व्यापाऱ्याला घेऊन निघाला. दुपारी एकच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन भीमाशंकर येथे पाेहोचला. दर्शन घेतल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन पुण्याकडे निघाला. भीमाशंकर परिसरातील जंगलातील रस्त्यावर रिक्षाचालकाने बतावणी करुन रिक्षा थांबविली. त्यानंतर व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याला धमकावून ऑनलाइन पद्धतीने साडेचार रुपये घेतले, तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये असे एकुण मिळून १९ हजार ५०० रुपये लुटले.

त्यानंतर जंगलात व्यापाऱ्याला सोडून रिक्षाचालक पसार झाला. घाबरलेला व्यपााऱ्याने या घटनेची माहिती तेथून जात असलेल्या भाविकांना दिली. व्यापारी पुण्यात पोहाेचला. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल कार्यालय परिसरात भेट दिली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×