Breking News
Pune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभा

पीएमपीच्या धडकेत प्रवासी महिला जखमी

Bopdev Ghat Car Accident

पीेएमपी चालकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पीएमपीच्या धडकेत प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. विजया दिलीप चव्हाण (वय ४६, रा. उंद्रे वस्ती, थेऊर रस्ता, केसनंद) असे जखमी झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी पीएमपी चालकाने अचानक बस वेगाने पाठीमागे नेली. अपघातात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याचे हाड, तसेच बरगडी फ्रॅक्चर झाली. उपचारानंतर चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पीएमपी चालकाने अचानक बस पाठीमागे घेतली. चालकाच्या चुकीमुळे दुखापत झाल्याची फिर्या द चव्हाण यांनी दिली. त्यानंतर पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार घुले तपास करत आहेत. यापूर्वी पीएमपी बसचालकांच्या चुकीमुळे गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (११ जुलै) घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी आनंदराव सरडे (वय ५८, रा. सरडे वस्ती, पेरणे गाव, नगर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सरडे हे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. लोणीकंद परिसरात जगताप डेअरीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार सरडे यांना धडक दिली. अपघातात सरडे गंभीर जखमी झाले, तसेच दुचाकीचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक घाेरपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×