Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरणारे गजाआड

चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १५ लाख रुपये आहे. चोरट्यांनी कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन, तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

माॅडेल काॅलनीत अश्लील कृत्य करणारा गजाआड – सविस्तर बातमी

महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. एनडीए पोलीस चैाकीमागे, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करुन दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली. तेव्हा अल्पवयीन दुचाकीवरुन निघाला होता. दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. पोलिसांना संशय आल्याने दुचाकीस्वार अल्पवयीनाला थांबविले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती.

पोलिसांनी संशयावरुन चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने साथीदार राजपूत याच्या मदतीने उत्तमनगर भागताून दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा दुचाकी चाेरल्याची कबुली त्याने दिली. तपासात राजपूत आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, तसेच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

राजपूत आणि अल्पवयीनाने मौजमजेसाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केले असून, त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×