Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआड

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – वादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणाऱ्या एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. धानोरीतील एका सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. विशाल राजेश खलसे (वय १९, रा. परांडेनगर, धानोरी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील धानोरी रस्त्यावर प्रियांश अपार्टमेट आहे. तक्रारदार तरुणाची आरोपी खलसे याच्याशी भांडणे झाली होती. त्यानंतर खलसे हा प्रियांश अपार्टमेंटच्या आवारात १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास आला. त्याने सोसायटीतील तळमजल्यावर लावलेल्या वाहनांना आग लावली. आगीत सहा वाहनांचे नुकसान झाले, तसेच सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या वीज वाहिनीला आगीची झळ पोहोचली. सोसायटीच्या आवारातील वस्तू आगीत जळाल्या. आगीच्या घटनेची रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. तक्रारदार तरुणाने आरोपी खलसे याच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन खलसे याला ताब्यात घेतले. चौकशीत तक्रारादाराशी झालेल्या भांडणातून वाहने पेटवून दिल्याची कबुली आरोपी खलसे याने पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×