लाल महाल कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
marathinews24.com
पुणे – पुणे शहरातील शनिवारवाड्याच्या बाजूला असलेल्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.त्या ऐतिहासिक घटनेची माहीती सर्वांना आहे.त्या पार्श्वभूमीवर लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून केलेल्या फजिती चे स्मारक बनवण्यात यावे,अशी मागणी लाल महाल स्मारक समितीचे मुकुंद चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावेळी मुकुंद चव्हाण म्हणाले, लाल महालात शाहिस्तेखान हा तीन वर्षे ठाण मांडून होता.त्यावेळी शाहिस्तेखान अनेक नागरिकांना त्याने हैराण करून ठेवले होते.पण अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करित त्याची बोटे छाटली.त्यानंतर शाहिस्तेखान तेथून पळून गेल्याची घटना घडली.त्यामुळे त्या घटनेला फर्स्ट सर्जिकल स्ट्राइक इन द वर्ल्ड अस ही म्हटले गेले आहे.त्यामुळे त्या घटनेचे शिल्परुपी स्मारक लाल महालात उभारण्यात यावे,जेणेकरून लाल महालात येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळण्यास मदत होईल,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.