Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात अट्टल घरफोड्याला अटक

पुण्यात अट्टल घरफोड्याला अटक

७ मोबाईलसह ३ दुचाकी जप्त, खराडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने, ७ मोबाईल, ३ दुचाकींचा समावेश आहे. कारवाईतून घरफोडीचा एक गुन्हा व वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे (३५, रा. पठारे ठुबे नगर, खराडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बारामती आरटीओ कार्यालयाकडून बेशिस्त चालक रडारवर – सविस्तर बातमी 

खराडी हद्दीतील भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल पावणे सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे १ सप्टेंबरला आरोपी बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे (३५, रा. पठारे ठुबे नगर, खराडी) याला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध पूर्वीचे मालमत्ता चोरीचे गुन्हेही असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीने चोरीसाठी वापरलेल्या मोटार सायकलच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेतील आणखी कलमे गुन्ह्यात वाढविण्यात आली आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, वसीम सय्यद, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, जयवंत श्रीरामे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×