Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

सराफी पेढीवरील दरोड्यातील आरोपींचा कसून शोध सुरू, धायरीतील सराफी पेढीवरील दरोडा प्रकरण

१०० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, धायरीतील सराफी पेढीवरील दरोडा प्रकरण

Marathinews24.com

पुणे – खेळण्यातील नकली पिस्तुलाचा वापर करून सराफी पेढीवर दरोडा टाकून तब्बल २० लाखांचे २२ तोळे सोने घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. ही घटना मंगळवारी भरदुपारी सिंहगड रस्त्यावर धायरीतील रायकर मळा याठिकाणी घडली होती. संबंधित ठिकाणी काळुबाई चौकात श्री ज्वेलर्स नावाचे सराफी पेढी आहे. दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात होते. त्यावेळी दुपारी दुकानात वर्दळ कमी असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात तोडांला मास्क लाऊन शिरला. त्याने सोनसाखळी दाखवा असे दुकान मालकास सांगितले. त्यानंतर दुकान मालक सोनसाखळी दाखवत असतानाच, आणखी दोनजण दुकानात शिरले. त्यांनी दुकानात शिरताच, पिस्तुलचा धाक दाखवून दुकान मालक व कामगारास धमकावून दरोडा टाकला होता.

फडतूस नही काडतुस हु मै, साडूला धडा शिकवण्यासाठी त्याने थेट दारुगोळा कारखान्यात केली चोरी – सविस्तर बातमी

तिघा दरोडेखोरांनी दुकानातील २२ तोळे दागिने पिशवीत टाकून पळून जात असताना कर्मचार्‍यांशी झटापट झाली. झटापटीत त्यांच्या हातातील पिस्तुल तुटुन खाली पडले. काही कळण्याच्या आतच चोरटे दुचाकीवररून पळून गेले. दरोड्याच्या प्रकारानंतर स्थानिक पोलिसांची पथके व गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक सीसीटिव्हींची तपासणी पोलिसांनी केली आहे. आरोपी ज्या दिशने पळाले त्या रस्त्यावरील सर्व सीसीटिव्हींची तपासणी करण्यात येत आहे. दरोडेखोरांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एका ठिकाणी सोडून ते दुसर्‍या वाहनाने पुढे पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासून आरोपींचा माग काढला जात आहे. दुकानाशी संबंधीत ग्राहकाचा, कर्मचार्‍यांचा या प्रकारात हात आहे का ? या दृष्टीने देखील तपास करण्यात येत आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांना आरोपींचा माग काढणे सुरू असल्याचे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×