रेसचा बैल पळवल्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

रेसचा बैल पळवल्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पिंपरी – रेसचा बैल पळवल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे कारण मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सुसगाव येथील वसुंधरा फ्लेक्स आणि पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी सिद्धांत कैलास मानमोडे (वय २०, सुसगाव, मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी 

प्रणव काशीनाथ वाघमारे ऊर्फ चिव्हया (वय १९, सुतारवाडी, पाषाण), क्षीरसागर आणि एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला असून प्रणवला अटक केली आहे. महिनाभरापूर्वी रेसचा बैल पळवण्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात शिवीगाळ झाली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घटनास्थळी फिर्यादीला गाठून आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

टेलिग्राम टास्कच्या बहाण्याने तरुणाची १३ लाखांची फसवणूक

पिंपरी – क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर ३०० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला १३ लाख ४१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मारुंजी येथील पार्क कनेक्ट सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली. याप्रकरणी अक्षय बापुजी वाघ (वय ३६, मारुंजी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन देशमुख नावाचे टेलिग्राम खाते वापरणारा अज्ञात व्यक्ती, बँक खातेदार आणि युपीआय धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीला टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये सामील करून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने एकूण १३ लाख ४१ हजार रुपये गुंतवले, मात्र जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले, तेव्हा ‘तुमचे पैसे ट्रेडिंग ॲपमध्ये अडकले आहेत’ असे सांगून आरोपीने आणखी ७ लाख रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×