एबी’ फॉर्म गिळला, शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा

एबी’ फॉर्म गिळला, शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा

‘एबी’ फॉर्म गिळल्याप्रकरणी उमेदवाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे गट ) उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘एबी’ फॉर्म गिळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली. उद्धव लहू कांबळे (वय ३४, रा. विवेकानंदनगर काॅलनी, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर (वय ५८) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

नववर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवादावर भर– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (३० डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ समीप आल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी विधानसभानिहाय उमेदवारांना ‘एबी’ अर्ज दिले. त्यामुळे एका जागेसाठी दोन-दोन जणांना अर्ज वाटप करण्यात आले. महापालिकेच्या सहकारनगर-पद्मावती या प्रभाग क्रमांक ३६ साठी शिवसेनेकडून पहिल्यांदा मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेकडून त्यांना ‘एबी’ अर्जही देण्यात आला. मात्र, त्यानंतर शिवसेनेकडून उद्धव कांबळे यांना ‘एबी’ अर्ज देण्यात आला आणि तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ढवळे यांची उमेदवारी कायम राहिल्याने छाननीच्यावेळी कांबळे यांनी ढवळे यांना दिलेला ‘एबी’ अर्ज खाऊन गिळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे भुतकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×