पुण्यात मोक्क्यातील फरार आरोपीला बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ठोकल्या बेड्या

marathinews24.com

पुणे – खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ महिन्यांपूर्वी हत्याराचा धाक दाखवुन जबरी चोरी करून दहशत पसरवून पळून गेलेल्या मेाक्कातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आफरद उर्फ गुड्या सलिम शेख (२४, रा. इंदीरानगर, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा अर्ज – सविस्तर बातमी

युनिट चारच्या पथकातील पथक पेट्रोलिंग करत तसाना पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम, अमंलदार हरीष मोरे, सुभाष आव्हाड यांना, वैभव रणपिसे यांना खडकीतील त्या मोक्काच्या गुन्ह्यातील सराईत मिरज सांगली येथे राहत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन १२ ऑगस्ट रोजी मिरज येथील हिरा हॉटेल चौतातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकीश केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांच्या पथकाने केली.

पिस्तुल बाळगणार्‍याला अटक, वाघोली पोलिसांची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला वाघोली पोलिसांनी आव्हाळवाडी डोमखेल रोड येथून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. अंबाजी कल्याणी शिंगे (२५, रा. नवीन म्हाडा कॉलनी, ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत वाघोली पोलिस ठाण्यातील पोलिस अमंलदार प्रदिप रावसाहेब मोटे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक मनोज बागल, अमोल काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तडीपारीच्या आदेशाचा भंग एकजण ताब्यात

तडीपारीचा आदेश भंग करून शहरात वावरणार्‍या सराईताला चतुःश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. धनराज उर्फ चिम्या काळुराम धोत्रे (२४, रा. जुनी वडारवाडी) असे ताब्यात घेतल्याचे नाव आहे. याबाबत गणेश पलांडे यांनी वेताळबा चौक जनवाडी येथून त्याला १२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. १२ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.

गुंतवणुकीच्या अमिषाने कोट्यवधींचा गंडा

इगल मोआ ड्रायव्हींग स्कुल याच्या शाखा वाढवुन व्यवसाय विस्तार करून जास्त देण्याचे व प्लॉटींग, बिगबुल कॉईमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून लोकांची २ कोटी ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेपडह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष काशिनाथ पवार (३०, रा. ब्रकुफिल्ड व्हिलो, पिसोळी आणि मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर फसवणूक, महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय विनोद बासुतकर (४२, रा. शिवम हाईट्स महमंदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी विविध ठिकाणी गुंतवणुकीचे आमिष दाखवून विजय बासुतकर यांच्याकडून ६९ लाख ५१ हजार, राजु सोनवणे यांच्याकडून ५ लाख ६४ हजार, खेमचंद जगवानी यांच्रूासकडून ३२ लाख ५० हजार, शंकरदास यांच्याकडून ३५ लाख, महेश शिंदे यांच्याकडून ६२ लाख १२ हजार तर श्रीकांत कांबळे यांच्याकडून २३ लाख ८९ हजार असे तब्बल २ कोटी ३१ लाख ६६ हजार रूपये घेऊन कोणताही फायदा करून न देता फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×