Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा अर्ज

न्यायालयात दाखल अर्जावर राहुल गांधी यांचाच आक्षेप-  अर्ज माघारी घेतला असल्याची वकीलांची माहिती

marathinews24.com

पुणे – लोकसभा निवडणुकीतील मत चोरीचे पुरावे सादर केल्याने तसेच तक्रारदार सात्यकी सावरकर हे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे वंशज असल्याने आपल्या जीवाला धोका असून, सरकारकडून प्रतिबंधात्मक संरक्षण मिळावे, असा अर्ज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी १३ ऑगस्टला पुण्याच्या विशेष न्यायालयात केला होता. मात्र, सायंकाळी उशिरा या अर्जावर राहुल गांधींनी आक्षेप घेतल्याची सारवासारव करत आज (गुरुवारी) तो मागे घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

सराईतांकडून चार पिस्तुलांसह, काडतुसे जप्त – गुन्हे शाखेची कारवाई – सविस्तर बातमी

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यात राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात ही पुरशिस (अर्ज) दाखल करत जीवाला धोका असल्यची तक्रार केली होती.

’राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा न करताच हा अर्ज तयार करून न्यायालयात दाखल केला असून, त्यातील मजकुरावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला असून तो अर्ज माघारी घेतला जाणार आहे,’ असे स्पष्टीकरण मिलिंद पवार यांनी सायंकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले.
विरोधी पक्ष नेत्यांसह ११ ऑगस्ट २०२५ रोजी ’व्होट चोर सरकार’ अशा घोषणा देत सत्ताधार्‍यांचा निषेध केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुमारे ३०० खासदारांना सराइत गुन्हेगाराप्रमाणे अटक करून बसमध्ये डांबून ठेवले होते. गांधी यांनी निवडणुकीतील अनियमिततेचे पुरावे सादर करत निवडणूक आयोगालाच थेट लक्ष्य केले होते.

तक्रारदाराच्या वंशाशी संबंधित हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तींच्या नोंदी; तसेच सध्याच्या राजकीय वातावरणाचा विचार करता राहुल गांधींना शारीरिक इजा होण्याचा, त्यांच्यावर खोटे आरोप किंवा लक्ष्य करण्याचा आणि इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा गंभीर धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिबंधात्मक संरक्षण देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे,’ असे अर्जात नमूद केले होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद भूषविणार्‍या राहुल गांधी यांनी न्यायालयात खोटे विधान करून न्यायालयाचा अवमान आणि शपथभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला. याप्रकरणी आता ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×