पादचारी तरुणाच्या खुनातील आरोपी पसारच

पोलिसांची शोध मोहीम सुरूच

marathinews24.com

पुणे – दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात गुरुवारी सायंकाळी घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाटी पोलिसांची पथके रवाना केली आहेत, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.

संक्रातीचे वाण खरेदी करणाऱ्या महिलेचा विनयभंग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चाबुकस्वार गुरुवारी (१ जानेवारी) सायंकाळी फुरसुंगी परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. दुचाकीवरील दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून आरोपी भरधाव वेगात पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या आकाशला नागरिकांनी त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आकाश याच्या खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हडपसरमधील काळेपडळ परिसरातून तरुणाचे अपहरण करून वैमनस्यातून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ३० डिसेंबर रोजी घडली. वैमनस्यातून प्रसाद वीरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी किरण भैरू चव्हाण (वय ३२), रोहित भरत गायकवाड (वय १८, दोघे रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्या दिवशी फुरसुंगी भागात पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात दोन खून झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×