Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

पुण्यात तरुणाचा खून करून पसार आरोपी सहा वर्षानंतर अटकेत

खराडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – तरुणाचा खून करुन मृतदेह नदीपात्रात टाकून पसार झालेल्या आरोपीला खराडी पोलिसांनी अटक केली. खून प्रकरणात आरोपी गेले सहा वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. अलका उत्तम बिल्डिंग, दत्त चौक, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी तेजस हा सराईत असून, त्याच्याविरुद्ध खडक, शिरुर, मुंढवा, चंदननगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन – सविस्तर बातमी

राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेलार याचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. ही घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये घडली होती. शेलारच्या मित्राने फिर्याद दिली आहे. शेलार याच्या खून प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शेलार हा खराडीतील एका लाॅजमध्ये थांबला होता. त्यावेळी आरोपी ढेरे आणि साथीदारांनी बाहेर फिरायला जायचे आहे, असे सांगून त्याचा खून केला होता. आरोपींनी या प्रकरणातील फिर्यादीला धमकावून त्याच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी, सोन्याचे कडे, घड्याळ, मोटार असा ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती.

मुख्य आरोपी तेजस ढेरे हा पसार झाला होता. ढेरे हा गेले सहा वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. तो खराडी परिसरात २५ एप्रिलला पहाटे तीनच्या सुमारास येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून एक मोटार जप्त केली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र चव्हाण, उपनिरीक्षक राहुल काेळपे, दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, विलास केदारी, साहेबराव गुंडाळे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×