अल्पवयीन मुलीला आत्महत्येतस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास

अल्पवयीन मुलीला आत्महत्येतस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास

गेवराई तालुक्यातील दिमागवाडी येथे घडली घटना

marathinews24.com

बीड – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून सहा महिन्याचा कारावास व एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील दिमागवाडी येथे घडली होती.

वराह पालनाच्या वादातून पिस्तूल बाळगणारा गजाआड – सविस्तर बातमी 

गेवराई तालुक्यातील दिमागवाडी येथील अल्पवयीन मुलगी बीड येथे शिक्षण घेत होती. मुलगी गावाकडे असतांना आरोपी मनिष उर्फ बाळू गंगाधर जायगुडे हा छेडछाड करत असे व तिचा पाठलाग करत होता दि. २९ मार्च २०२२ रोजी मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी जायगुडे यांच्या विरोधात गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन डीवायएसपी राठोड यांनी केला होता. हे प्रकरण बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात ९ साक्षीदार तपासले होते.

पिडिता, प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांचा पुरावा ग्राह्य मानून न्यायधीश व्यंकटेश पाटवधकर यांनी आरोपीला दोषी ठरवत सहा महिने शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल अजय तांदळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी गव्हाणे, सहाय्यक पो.कॉ. सविता चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×