Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

स्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

स्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

वाहतूक पोलिसांकडून ३७५ रिक्षाचालकांवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकात ३७५ बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली. पोलिासांनी रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत तांत्रिकदृष्ट्या व्यवसाय करण्यास अपात्र असलेल्या दहा रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे स्वारगेट चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. बेशिस्तपणे स्वारगेट एसटी स्थानकातील प्रवेशद्वाराच्या परिसरात रिक्षा लावण्यात आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी व्हायची.

वादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआड – सविस्तर बातमी 

स्वारगेट परिसर अहोरात्र गजबजलेला असतो. या भागात एसटी थांबा, पीएमपी, तसेच मेट्रो स्थानक आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्वारगेट चौकात बेशिस्तपणे रिक्षाचालक व्यवसाय करायचे. एसटी, पीएमपी स्थानकाच्या परिसरात रिक्षा लावण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत व्हायची. वाहतूक कोंडीतून वाट काढत प्रवाशांना या भागातून जावे लागायचे. बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर आणि पथकाने या परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
‘क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, भाडे नाकारणे, तसेच व्यवसायास अपात्र असलेल्या रिक्षा, वाहतूकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन दिवसांत ३७५ रिक्षा चालकांवर कारवाई केली’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

स्वारगेट परिसरात नियमित कारवाई

‘स्वारगेट परिसरात यापुढील काळात नियमित कारवाई करण्यात येणार आहे. पीएमपी बसला स्वारगेट चौकात वळणाना अडथळा होत होता. सिग्नल तोडण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी व्हाययची. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यापुढे नियमित कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे’, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×