Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका

अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका

‘जॉली एलएलबी ३’ वादाच्या भोवऱ्यात

marathinews24.com

पुणे – जॉली एलएलबी या चित्रपटाचे दोन भाग पूर्वीच प्रदर्शित झालेले असून जॉली एलएलबीचा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. संबंधित चित्रपट वकील आणि न्यायालया भोवती चित्रपटाचे कथानक घडत आहे. मात्र स्वातंत्र्यच्या नावाखाली चित्रपटातील कलाकार व निर्माते यांनी चित्रपटात थेट वकिल व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत. तरी चित्रपट प्रदर्शित होवू नये याकरीता पुण्यातील वकील ॲड. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. दिवाणी न्यायाधीश पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून कोर्टाने अभिनेते अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना कोर्टात २८ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूर्वसूचना न देता काम; सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी 

ॲड. वाजिद खान म्हणाले, चित्रपटाचा म्हणजेच जॉली एलएलबी ३ टिझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मल्लिन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायालयात धाव घेवून चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्यासाठी धाव घेतली होती. आर. सी. एस. क्रमांक ८७८/२०२४ त्यानुसार वरिष्ठ विभागातील १२ वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले असून त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या २८ ऑगस्ट रोजी पहिली तारीख असून अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो असे नेहरबान कोर्टाने म्हटल्याने जॉली एलएलबी ३’ चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×