Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत

 खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत

शिवाजीनगर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रांतवाडी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा खून केल्यानंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत ही घटना घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. विश्रांतवाडी भागात १५ एप्रिल रोजी मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर काेयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती.

तळजाई वसाहतीत दुचाकींची तोडफोड करणारा अटकेत – सविस्तर बातमी

तेलंगीचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. ’ प्रतिस्पर्धी टाेळीतील सराइतांना साथ देऊ नका. तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू’, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×