पवारांनी दुसर्यांदा जबाब नोंदवला, सीआयडीकडून वेळकाढूपणाचा केला आरोप
marathinews24.com
पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा घातपातच झाले आहे. सीआयडीकडून प्रकरणाचा तपास होत असताना, व्हीएसआर कंपनीसह त्यांच्या मालकाला प्रशासनाकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. दरम्यान, आमच्याकडील माहिती आणि एआयबीच्या रिपोर्टमधील त्रुटीचा अभ्यास करीत आज पुन्हा स्टेटमेंट नोंदवले आहे. मागच्यावेळी रिपोर्टनंतर एफआयआर घेउ असे सीआयडीने सांगितले होते. आज त्यांनी एआयबीच्या फायनल रिपोर्टनंतर एफआयर घेउ असे सांगितले आहे. एकीकडे २०२३ मध्ये याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याचा फायनल रिपोर्ट अजून नाही. त्यामुळे एफआयआर करण्यात टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सीआयडी कार्यालयात दुसर्यांदा जबाब नोंदवल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळ – सविस्तर बातमी
आमदार रोहित पवार म्हणाले, आम्ही एफआयआर करण्यासाठी प्रयत्न करीत असून, आम्ही दादांसाठी लढतोय, पाठपुरावा करतोय, तरीही गुन्हा दाखल केला नाही. गुरूवारी (दि.५) व्हीएसआर कंपनीचा व्ही. के सिंग सीआयडी कार्यालयात आला होता. त्यावेळी त्याच्या सुरक्षा यंत्रणेकडे एके ४७ रायफल होते. राज्याच्या सीआयडी कार्यालयात आल्यांनतर त्याच्यासोबत गार्ड येतात. मात्र, पत्रकारांसह आमच्या पदाधिकार्यांना सीआयडीमध्ये प्रवेश करताना विनवणी करावी लागली. चौकशीनंतर बाहेर जाताना व्ही के सिंग दिसला नाही. तो काळ्या काचेच्या पोलिसांच्या गाडीतून गेला का, पत्रकारांसमोर का आला नाही, अशीही विचारणा पवार यांनी केली. दरम्यान सीआयडीतील अधिकार्यांवर दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल केला जात नाही. हवेत गोळ्या झाडण्याचा प्रकार असून, त्यांना तपास करायचा नाही. संबंधित कंपनीला वाचवायचे आहे. जे सत्तेत लो आहेत, ते मात्र, भूमिका घेत नाहीत.
दिल्लीत उद्या घेणार आघाडीच्या नेत्यांची भेट
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यासह आघाडीच्या पदाधिकार्यांना भेटून संसदेत या विषयाची चर्चा करावी, अशी विनंती करणार आहे. यापुर्वी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज ठाकरे यांनाही भेटलो आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राहूल गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेशकुमार, तृणमुलच्या प्रमुखांना भेटणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
आजही १८० कलमानुसार जबाब नोंदवला
सीआयडी कार्यालयात अधिकार्यांची भेट घेतली अहे. डीजीसीए रिपोर्ट आला होता. मात्र, रिपोर्ट अद्यापही सीआयडीपर्यंत पोहोचला नाही. हा रिपार्ट सगळ्यांकडे असून, अजून सीआयडीला का मिळाले नाही. आम्ही अभ्यास करून प्रश्न विचारले आहे, २४ फेबु्रवारीला सीआयडीने दुर्लक्ष केले. आता म्हणतायेत रिपोर्ट बघितला असल्याचे सांगत असल्यामुळे घोळ आहे. कलम १८० नुसार स्टेंटमेंट त्यावेळी दिले होते. गेल्या १० दिवसांतील स्टेंटमेंट आजही दिले आहे. त्याची दखल सीआयडीला घ्यावी लागते. जर सीबीआयकडे तपास गेला तर तपास गांभीर्याने करावी लागतो. फक्त मराठी अधिकार्यांना तपास करण्यास द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
पॉवरफुल व्यक्तीमुळेच गुन्हा दाखल होत नाही
प्रकरणातील नावे व्ही के. सिंगला माहिती असावीत. त्याच्यावर कारवाई झाल्यास तो नावे सांगेल, त्याची भीती संबंधित पॉवरफुल व्यक्ती किंवा संस्थेला असावी. त्यामुळेच त्याच्यावर कारवाई होत नाही. जर हा घातपात आहे, तर त्यामगे कोण आहे तो सिंग सांगू शकेल, म्हणून त्याला वाचवले जात आहे. लढण्यासाठी आपल्याला जिद्द लागते, न्याय देण्यासाठी नुकसान सहन करावा लागतो. आम्ही विरोधात राहून लढतोय, सत्तेतील नेत्यांनी यंत्रणांचा वापर करून लढायला काय हरकत आहे, अशीही मागणी त्यांनी केली.
सीआयडी वेळकाढूपणा करीत आहे
अकस्मात मृत्यूप्रकरणात सीआयडी वेळकाढूपणा करीत आहेत. यापुर्वी महिनाभर थांबले होतो, आता रिपोर्ट आल्यानंतरही म्हणतायेत फायनल रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करू. अपघाताचा फायनल रिपोर्ट तीन वर्षांनी आणणार आहेत का, त्यांचे असे मत आहे की लोक विसरतील तेव्हा ते रिपोर्ट क्लोज करतील. दरम्यान, विमान अपघातास्थळी झाडंच नसून, चुकीचा अहवाल दिला जात आहे. सगळ्या प्रकरणामागे पॉवरफुल व्यक्तीचा हात आहे, असा आरोप पवार यांनी केला.
व्ही के. सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट
विमान कंपनीचा मालक सीआयडी कार्यालयात दाखल झाला तेव्हा त्याला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. त्याची गाडी सुरक्षा यंत्रणेसह गेटमधून आतमध्ये सोडली. त्याला नाश्ता, चहापानाची सोय करण्यात आली होती. तसेच विश्वचषकातील सेमी फायनल मॅच त्याने सीआयडी कार्यालयात काही वेळ पाहिली आहे. व्ही. के. सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
























