Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणे

राजा दांडेकर यांची आत्मकथा असलेल्या कार्यकर्ता पुस्तकाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – माणसात राहणारा कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही. तो सतत काही ना काही करतच असतो. डॉ. राजा दांडेकर हे सुध्दा असेच असून, ते सतत कामात मग्नतेने पुढे जात असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले आहे. डॉ. राजा दांडेकर यांची आत्मकथा असलेल्या कार्यकर्ता पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते एस एम जोशी सभागृहात करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक महोत्सव संपन्न – सविस्तर बातमी 

यावेळी सुधीर जोगळेकर, विजय कुवळेकर, लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) डॉ. राजा दांडेकर उपस्थित होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, डॉ. राजाकडून मिळालेली तीन पुस्तके मी कधीच माघारी दिली नाहीत. त्या पुस्तकांनी मला घडवले. एक होता कार्व्हर पुस्तक वाचल्याने मला दिशा मिळाली. कौशल्यावर आधारित शिक्षण, स्वतः चा शोध घेणारा डॉ. राजा दांडेकर असल्याचे त्यांनी सांगितले. आमची समांतर वाटचाल असून, तरीही डॉ. राजा माझ्या कामातील आदर्श आहे. ९० च्या दशकात हिंदुस्थानमध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, राजा व्यक्तीगत जीवनात फकिरी असून, सतत नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

डॉ. राजा दांडेकर म्हणाले, पक्ष निरपेक्ष राहून सार्वजनिक काम करता आले पाहिजे. त्याकाळी ५ ते १० वर्षात काम केलेला पदाधिकाऱ्याचा राजकारणी होता येत होते. पण मला सत्ता आणि संपत्तीचा लोभ कधीच नव्हता. कोणतेही निर्णय चुटकीसरशी घेता आले पाहिजे. आजही आम्ही शेतकरी असून, आमच्या पिढ्या शेतात काम करण्यात गेल्या आहेत. सुरवातीचे दिवस सत्त्वपरीक्षा असते, तिथे आपण कधीच थांबायचे नाही. मुसळधार पाऊस पडत असताना मी पोहत जाऊन रुग्णाला तपासायला गेलो होतो. अशी आठवण डॉ. दांडेकर यांनी सांगितली.

संकटांना संधी मानून कांम केले तर पुढे दारे उघडी मिळतील. दरम्यान, जगावे कसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला मिळते. माझे अस्तित्व नसतानाही गावाकडील एकजण शहरात येऊन आयुर्वेदिक शिक्षण घेऊन पुढे जातो याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधीर जोगळेकर म्हणाले, आमची भेट आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेताना झाली होती. तेंव्हापासून आमची मैत्री असून, आम्ही विविध कार्यात सोबत होतो. आणीबाणीला जशी ५० वर्षे पूर्ण झाली तशी आमच्या मैत्रीलाही झाली आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. लेखक सुमेध वडावाला यांनी उत्तमरित्या पुस्तक लिहले असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×