खूनातील आरोपीला सातार्यातून बेड्या, वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – ताडी पिण्याच्या दुकानात झालेल्या वादातून टोळक्याने जेष्ठाला ढकलून दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. संबंधित खूनाची घटना २५ एप्रिलला वानवडीतील शांतीनगरात घडली होती. याप्रकरणी खुनातील मुख्य आरोपीला वानवडी पोलिसांनी सातार्यातून अटक केली आहे. आकाश हरिश्चंद्र दांडे (वय २० रा. लक्ष्मीपार्क, कोळसा गल्ली, मोहम्मंदवाडी) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. यापुर्वी अदिल हनीफ शेख आणि पांडा ऊर्फ पांडुरंग नामदेव पवार यांना अटक केली आहे. मलंग मेहबुब कुरेशी (वय ६० रा.लेननंबर १२, शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या जेष्ठाचे नाव आहे.
बाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी
वानवडीतील शांतीनगरमध्ये असलेल्या सरकारमान्य ताडी विक्री दुकानात मलंग कुरेशी २५ एप्रिलला थांबले होते. त्यावेळी आरोपी आकाश दांंडे याच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर संबंधिताने त्याचे साथीदार अदिल शेख, पांडा पवार यांना बोलावून घेत मलंग यांना बेदम मारहाण करीत त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने ताडी दुकानाच्या दरवाज्याचे लोखंडी चौकटीवर जोरात ढकलून दिले. त्यामुळे गंभीर जखमी झाल्यामुळे मलंग यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१),११५ (२), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तातडीने आरोपी अदिल शेख आणि पांडा ऊर्फ पांडुरंग पवार यांना अटक केली.
जेष्ठाच्या खूनातील मुख्य आरोपी आकाश दांडे पसार झाला होता. तो सातार्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वानवडी तपास पथकाचे टिमने सातार्यातील नामदेव वडारवाडी गाठले. तांत्रिक विश्लेषणात आरोपी दांडे हा काही वेळापुर्वीच परिसरातून निघुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला आणेवाडी, ता. वाई, जि. सातारा येथुन ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने ताडी पिऊन बाहेर आल्यावर मलंग कुरेशी याच्यासोबत किरकोळ कारणांवरुन वाद झाल्याचे सांगितले. रागातून त्याला दरवाज्यावर जोरात ढकलुन दिल्याची कबुली त्याने दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अभिजीत चव्हाण, सोमनाथ कांबळे यांनी केली आहे.