Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी

'हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी

३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – श्री गुरु तेग बहादुर साहिबांच्या शिकवणी आणि त्यांचे हौतात्म्याची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे वरिष्ठ विश्वस्त हरजितसिंग बेदी यांनी दिली.

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली- संदीप खरे – सविस्तर बातमी 

बेदी म्हणाले, साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांची शहीदी संपूर्ण मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होते. खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रशासन आणि सिख, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल, सिंधी आणि गुरुनानक नाम लेवा संगत-समुदाय एकत्रितपणे जय्यत तयारी करीत आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजीचे त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल श्री. बेदी यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×