Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

उमरटीतून १५ पिस्तुले आंदेकर टोळीने विकत घेतली

उमरटीतून १५ पिस्तुले आंदेकर टोळीने विकत घेतली

आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल होणार

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड आंदेकर टोळीने मध्य प्रदेशातील उमरटी गावातून १५ पिस्तुलांची खरेदी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या पिस्तुलांचा विविध गंभीर गुन्ह्यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी नुकतेच उमरटी ऑपरेशन राबवून ५० ठिकाणी सुरू असलेले पिस्तूल बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले होते. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

‘न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

शहरात काही महिन्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात सराईतांकडून पिस्तुलांचा वापर वाढला होता. तसेच विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पिस्तुले जप्त केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी मध्य प्रदेशातील उमरटी गावातून पिस्तूल खरेदी केली असल्याचे सांगितले होते.त्यापार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १०५ पोलिसांच्या पथकाने संपूर्ण नियोजन करीत मध्य प्रदेशातील उमरटी गावात ऑपरेशन राबवले. त्या ठिकाणावर सुरू असलेले ५० शस्त्र बनवण्याचे कारखानेही उध्वस्त केले होते. याप्रकरणी अटक केलेल्या ७ जणांकडे कसून चौकशी करण्यात आली.

अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार आंदेकर टोळीनेही उमरटी गावातून १५ पिस्तुले खरेदी केल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्याचा वापर विविध गंभीर गुन्ह्यात केला आहे. गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, आयुष काेमकर, गणेश काळे खूनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातील उमराटी गावातून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन उमरटी राबवण्यात आले.

अटकेतील आरोपींनी दिली माहिती अन आंदेकर टोळीची लिंक उघडकीस

उमरटी गावात बनवलेल्या देशी बनावटीच्या शेकडो पिस्तुलांची विक्री पुण्यात केली आहे. पिस्तुले स्थानिक कारागिरांकडून तयार केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. सनीभाई चावला (वय ३७), जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला (वय २२), प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना (वय २२), राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (वय ३६), अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला (वय २७), नानाकसिंग अजितसिंग बर्नाला (वय ३२), गुरुचरणसिंग बर्नाला (वय २३, सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×